मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
Home » राज्य » पर्यटन » महाबळेश्वरात मुसळधार पाऊस; रेकॉर्डब्रेक पर्जन्यमानाची नोंद

महाबळेश्वरात मुसळधार पाऊस; रेकॉर्डब्रेक पर्जन्यमानाची नोंद

महाबळेश्वरात मुसळधार पाऊस; रेकॉर्डब्रेक पर्जन्यमानाची नोंद

महाबळेश्वर (प्रतिनिधी) :महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी तब्बल रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने शहर आणि परिसर झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, १ जून ते १९ ऑगस्ट सकाळी ८.३० वाजेपर्यंत महाबळेश्वर येथे ४५६८.१० मिमी (१७९.८५८ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी दिवसभर धुवाधार सरी कोसळत राहिल्या.

       आठवडे बाजार ठप्प मंगळवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने डोंगरी व दुर्गम भागांमधून आलेल्या शेतकरी, नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली. बाजारपेठ परिसरातील गटारांमधून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. तर विक्रेत्यांना देखील व्यापारात अडचणींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था तातडीने सुधारावी, अशी मागणी होत आहे.

      पर्यटनावर परिणाम धुवाधार पावसातही काही पर्यटक पावसाळी सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. बाजारपेठ, श्री महाबळेश्वर मंदिर, केट्स पॉईंट, किंग्ज चेअर, गणपती मंदिर, वेण्णा लेक आदी ठिकाणी पर्यटकांची वर्दळ दिसून आली. मात्र, महाबळेश्वर–पाचगणी रस्ता अत्यंत खराब स्थितीत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

           पर्यटकानी प्रशासनावर टीका केली सातारा जिल्ह्यात तब्बल चार मंत्री असतानाही महाराष्ट्राचे “नंदनवन” समजल्या जाणाऱ्या पाचगणी–महाबळेश्वर रस्त्यांची एवढ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली पाहून पर्यटकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. पर्यटन हंगामात अशा दयनीय अवस्थेतील रस्त्यांमुळे राज्याच्या प्रतिमेलाच धक्का बसत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Post Views: 629 मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कराड(अली मुजावर )प्रतिनिधी

Live Cricket