अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » 8 मार्च 2026 महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशन च्या सदस्या सौ अनुजा आदित्य त्रिपुटे यांचा सत्कार.

8 मार्च 2026 महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशन च्या सदस्या सौ अनुजा आदित्य त्रिपुटे यांचा सत्कार.

8 मार्च 2026 महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशन च्या सदस्या सौ अनुजा आदित्य त्रिपुटे यांचा सत्कार.

फलटण रनर्स फाऊंडेशन महिला सदस्या सौ. अनुजा आदित्य त्रिपुटे यांनी 8 मार्च 2023 रोजी महिला दिना निमित्त नीरा येथील मॅरेथॉनमध्ये प्रथम सहभाग नोंदवून आपल्या रनिंग प्रवासाची सुरुवात केली आणि 5 किमी धाव पूर्ण केली.

यानंतर सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी लोणावळा येथे झालेल्या टाटा अल्ट्रा (डोंगर रांगामधील)मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवून अवघड अशी 50 किमी धाव यशस्वीरीत्या पूर्ण केली व फलटण तालुक्या मधील पहिली अल्ट्रा मॅरेथॉन महिला रनर म्हणून मान मिळवला

त्यांच्या मॅरेथॉन प्रवासाचा आढावा 

 2023 मध्ये 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी अशा एकूण 7 मॅरेथॉन पूर्ण.

• 2024 मध्ये 21 किमीच्या 5 मॅरेथॉन पूर्ण.

• 2025 मध्ये 21 किमीच्या 2 आणि 42 किमीच्या 2 मॅरेथॉन पूर्ण केल्या. यामध्ये टाटा मुंबईसारखी नामांकित मॅरेथॉन देखील यशस्वीरीत्या पूर्ण केली.

• 2026 मध्ये लोणावळा येथे झालेल्या टाटा मुंबई अल्ट्रा (डोंगराळ भागातील)मॅरेथॉनमध्ये 50 किमी धाव पूर्ण केली.

अशा ध्येयवादी व प्रेरणादायी महिला सदस्या सौ. अनुजा आदित्य त्रिपुटे यांचा महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशन च्यावतीने सत्कार करण्यात आला आणि इतर सर्व महिलांना या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी फलटण रनर्स फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ रवींद्र शिंदे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket