कोरेगाव येथे 6 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
सातारा दि. 28 : सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 6 मे रोजी डि. पी. भोसले कॉलेज कोरेगाव येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.
या रोजगार मेळाव्यात कुशल/अर्धकुशल कामगार अशा सदर मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर अशा प्रकारचे एक हजार अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी 6 मे रोजी डी.पी. भोसले, कॉलेज कोरेगाव येथे आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.




