लोकसेवक नामदेव (आप्पा) चोपडे : विकासासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा ६३ वा वाढदिवस
पाचगणी (प्रवीण घाडगे )पाचगणीच्या सामाजिक, व्यापारी आणि राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे पाचगणी टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.नामदेव (आप्पा) चोपडे यांचा आज ६३ वा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.
साधेपणा, लोकांप्रती असलेली आत्मीयता आणि विकासासाठीची तळमळ या गुणांमुळे आप्पा चोपडे हे पाचगणीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी “मनीषा सायकल मार्ट” या व्यवसायातून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. मेहनत, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी जपलेले स्नेहसंबंध यांच्या जोरावर त्यांनी व्यवसायात यश संपादन केले.
व्यापारी क्षेत्रात सक्रिय असतानाच त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले. नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी धावून जाणारे आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. याच लोकाभिमुख कार्याच्या जोरावर त्यांनी दोन वेळा पाचगणी नगर परिषदेचे नगरसेवक पद भूषविले.
नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाचगणीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. विकासाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आणि लोकहिताला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सध्या पाचगणी टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून ते व्यापाऱ्यांच्या समस्या आणि पर्यटन विकासासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. व्यापारी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधत पाचगणीच्या प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निरोगी, दीर्घायुषी आणि समाजसेवेचे कार्य असेच अखंड सुरू राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.




