Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील रस्त्यांसाठी 63 कोटी 32 लाख मंजुर आ.मकरंद पाटील यांचा पाठपुरावा

वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील रस्त्यांसाठी  63 कोटी 32 लाख मंजुर आ.मकरंद पाटील यांचा पाठपुरावा 

वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील रस्त्यांसाठी  63 कोटी 32 लाख मंजुर आ.मकरंद पाटील यांचा पाठपुरावा 

ग्रामस्थांमधून समाधान

खंडाळा : वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणून दळणवळण सुकर करणाऱ्यासाठी आ. मकरंद पाटील यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या मतदारसंघातील उर्वरित रस्ते करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विविध रस्त्यांच्या कामासाठी 63 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा फायदा दळणवळणासाठी होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

       यासंदर्भात आ. मकरंद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की , वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील वाहतूक सुविधा अधिक सुरळीत आणि  सुरक्षित व्हावी, ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी मतदारसंघातील खराब झालेले रस्ते करणे आवश्यक होते. यासाठी लोकांची सातत्याने मागणी होती. रस्ते दर्जेदार बनविण्यासाठी आ. मकरंद पाटील यांनी राज्यस्तरावर  पाठपुरावा  करुन या रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन घेतला आहे. 

      या मंजुर कामांमध्ये वाई तालुक्यातील 1) बेलमाची ते काळंगवाडी रस्ता        (4 कोटी 91 लाख),2)लोहारे ते  पेढावस्ती भोसलेवस्ती  रस्ता (4 कोटी 3 लाख),3) मांढरदेव पालान रस्ता (6 कोटी 71 लाख), खंडाळा तालुक्यातील      1) हायवे ते गावडेवाडी (4 कोटी 17 लाख) 2) एम.डी.आर.2 ते चाहुरवस्ती (कवठे)(4कोटी 78 लाख),3) शिरवळ लोणंद हायवे पासुन ननावरेवस्ती (अंदोरी)  (2 कोटी 71 लाख),महाबळेश्वर तालुक्यातील  1) ओ.डी.आर-26 ते घोणसपूर रस्ता (7 कोटी  99 लाख),2)राज्यमार्ग 140 ते एरंडल रस्ता (5 कोटी 61 लाख),   3) रामा 140 ते नावली शिंदोळा रस्ता (5 कोटी 77 लाख), 4) प्रजिमा-17 ते दुधोशी रस्ता (2 कोटी 82 लाख), 5)एम.डी.आर.-26 ते येरणे बु. रस्ता        (13 कोटी 79 लाख) 

     वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांसाठी 63 कोटी 32 लाख एवढा भरघोस निधी मिळाल्याने जनतेमधून समाधान  व्यक्त होत आहे. मंजुर कामे त्वरीत सुरु करुन ती दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 79 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket