अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड करणाऱ्या आरोपीला ६ महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
रहिमतपुर- दि.२४/०७/२०१६ रोजी सकाळी १०.१५ वा. चे सुमारास ते दि.२७/०७/२०१६ रोजी पर्यत मौजे रहिमतपुर ता. कोरेगाव गावी दिग्विजय टॉकीज समोर, गणपती मंदिराजवळ व कॉलेज परिसरात यातील आरोपी १. अमर गोविंद शेजवळ वय २१ वर्षे २. सुनिल आत्माराम शेजवळ वय २१ वर्षे दोन्ही रा. सुळेवाडी ता.पाटण जिल्हा सातारा यांनी आपसात संगणमत करून यातील पिडीत वय १७ वर्षे रा. काशीदगल्ली रहिमतपुर ता. कोरेगाव जि. सातारा हिचा मोटारसायकल वरून पाठलाग करून तिला अडवून आरोपी नं १ अमर गोविंद शेजवळ वय २१ वर्षे याने मला तू लय आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे असे समक्ष व मोबाईलवर वारंवार फोन करून त्रास दिला आहे व त्यास आरोपी क्र २ सुनिल आत्माराम शेजवळ वय २१ वर्षे याने मदत केली आहे म्हणून वगैरे मजकूराची खबर दिल्याने गुन्हा रजिस्टर दाखल केला होता.
तत्कालीन श्री.एस एस कानुगडे सहा. पोलीस निरीक्षक रहिमतपुर पोलीस स्टेशन यांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन मा. न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते. B.N.S.S.२०२३ मधील नविन तरतुदी प्रमाणे आरोपी फरार असताना देखील या खटल्याचे कामकाज चालवून संपुष्टात आणले आणि दोषसिध्दी झालेवरून फरार आरोपीचे गैरहजेरीत शिक्षा सुनावनी करण्यात आली कायदयातील नविन तरतूदीचा वापर करून आशा प्रकारे खटला चालवून पुर्णत्वास नेहण्याची सातारा विशेष न्यायालयातील पहिलीच घटना असल्याने यास विशेष महत्व प्राप्त होते.
सदरचा खटला मा. श्रीमती एस पी पोंक्षे सो, विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, (३) सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे श्रीमती तळलकर जिल्हा सरकारी अभियोक्ता, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले तसेच साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा साक्षीदारांचे साक्षीवरून व जिल्हा सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद केलेने समोर आलेला पुरावा ग्राहय मानुन मा. न्यायाधीश साो मा. श्रीमती एस पी पोंक्षे सो, विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांनी आज दि. १८/०८/२०२६ रोजी यातील आरोपी क्रमांक १ यास भारतीय दंड संहिता कलम ३५४ (ड) अन्वये शिक्षा पात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरविणेत आले आहे आणि त्याला ०६ महिने सक्त कारावास व रुपये ५०००/- (फक्त) पाच हजार रुपये) दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरलेस त्याला १५ दिवसाची साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मा.श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव विभाग कोरेगाव व श्री. विनोद नेवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक रहिमतपुर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन पोकॉ/१३५६ विनोद मोरे नेमणुक रहिमतपुर पोलीस स्टेशन यांनी कामकाज पाहिले.





