पाकिस्तान हादरला, राजधानी इस्लामाबादमध्ये मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, 50 ठार
पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील एका शिया इमामबारगाह येथे शुक्रवारी दुपारी नागरिक नमाज पठणासाठी एकत्र जमले होते, यावेळी अचानक एका आत्मघाती हल्लेखोराने मशिदीच्या प्रवेशद्वारावरच स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण स्फोटात आतापर्यंत किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस सूत्रांनी सांगितले क हल्लेखोराला इमामबारगाहच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांनी रोखले होते. मात्र तो इमारतीच्या परिसरात २० मीटर आत पर्यंत धावत गेला आणि त्याने स्वतःला उडवून दिले.
दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले की दहशतवाद्यास मुख्य दरवाज्याजवळ रोखण्यात आले आणि तेव्हाच दहशतवाद्याने गोळीबार करण्यास सुरूवात केली.तो किमान २० मीटर आत धावत आला आणि नमाज पठण सुरू असतानाच, त्याने स्वत:ला उडवून दिले,” असे वृ्त्त प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने जिओ न्यूजने दिले आहे.
नमाजच्या वेळी मशिदीत मोठी गर्दी असते, नेमके हीच वेळ साधून नमाज पठण सुरू झाल्याबरोबर स्फोट झाला. या स्फोटात १३० हून अधिक जण जखमी असल्याने, या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानंतर हल्लेखोराने पहिल्यांदा गोळीबार केला, ज्यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाले, त्यानंतर हल्लेखोर मेन दरवाज्यामधून मशिदीच्या परिसरात सुमारे २० मीटर आतमध्ये गेला, आणि त्याने स्फोट घडवून आणला, असे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे. स्फोट होण्यापूर्वीच्या काही मिनिटांत नेमकं काय घडलं याबाबत बचावकर्ते आणि जखमींनी माहिती दिली आहे.
हुसेन शाह यांनी सांगितले की ते स्फोट झाला तेव्हा मशिदीच्या आवारात नमाज अदा करत होतेय. “मला लगेच वाटून गेले की एक मोठा हल्ला झाला आहे,” असे त्यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले.त्यांनी सांगितले की त्यांनी मशिदीत प्रवेश केला आणि त्यांना सर्वत्र गोंधळ पाहायला मिळाला, अनेक जण जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडत आणि रडत होते. शाह यांनी शांगितले की त्यांना मशिदीत ३० मृतदेह दिसून आले तर जखमींचा आकडा आणखी मोठा होता.
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, त्यामुळे तीन मजली इमामबारगाहच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. जवळपासच्या निवासी इमारतींचेही मोठे नुकसान झाले. यानंतर जखमींना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) मध्ये दाखल करण्यात आले.
स्फोटानंतर कायदा सुव्यवस्था यंत्रणा यासह पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्स, यांनी परिसराला घेरले आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.




