मंजू इन्स्टिट्यूटचा 30 वा वर्धापन दिन
सातारा : मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना १५ ऑगस्ट १९९४ रोजी कै. महादेव चव्हाण यांनी केली.संस्था स्थापण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अल्प प्रकारचे फीमध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून एक भारताचा जबाबदार नागरिक बनविणे हा आहे.
मंजू इन्स्टिट्यूट गेली तीस वर्षे झाली नवनवीन उपक्रम राबवत दिमाखात उत्कृष्टरित्या कार्यरत आहे.संस्थेत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ मुंबई (MSBTE) उच्च शिक्षण तंत्र मंडळाची मान्यता आहे.संस्थेचे सर्व अभ्यासक्रम विद्यापीठ मान्यता प्राप्त राबविले जातात. संस्थेमध्ये Bsc.हॉस्पीटॅलिटी स्टडीज 3 वर्षे डिग्री सेमिस्टर पॅटर्न युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाची मान्यता असणारे सातारा जिल्ह्यातील एकमेव कॉलेज आहे. डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट दोन वर्षे दहावी पात्रता., सी सी इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी बारावी पास पात्रता असणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल विकास मंडळ मुंबई (MSBE) मान्यताप्राप्त डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राप्समन ( वास्तुशास्त्र आरेकख) दोन वर्षे, डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग दोन वर्षे, सी सी इन कन्स्ट्रक्शन सुपरवायझर एक वर्षे पात्रता दहावी पास अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.MSBTE उच्च तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचा डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईनिंग अँड डेकोरेशन – २ वर्ष कालावधी दहावी पास पात्रता असणारा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
मंजू इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यातील अद्यावत कॉलेज आहे. डिजिटल क्लासरूम, तज्ञ प्राध्यापक, साईट विजिट, इंडस्ट्रियल व्हिजिट प्रॅक्टिकल नॉलेज वर जास्तीत जास्त या ठिकाणी भर दिला जातो. विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा देखील उपलब्ध आहे. मंजू इन्स्टिट्यूट चे अनेक विद्यार्थी परदेशामध्ये यशस्वी करिअर करत आहेत. दुबई मॉरिशस अबुधाबी ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले यशस्वी करिअर मंजू इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून घडविले आहे. विद्यार्थ्या आणि पालकांचे संस्थेस मोठे सहकार्य लाभत आहे याच कारणाने संस्था 31 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
वर्धापनदिना निमित 15 ऑगस्ट रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सत्यनारायन महापूजा, रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा,पाक कला स्पर्धा, आर्किटेक्चर व इंटेरियर मॉडेल मेकिंग स्पर्धा, आरी वर्क, एम्ब्रोईडरी, स्केचिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
संस्थेच्या सर्व आजी व माजी विद्यार्थ्यांनी संस्था कार्यालयामध्ये येऊन सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा लाभ घ्यावा असे संस्थेचे प्राचार्य श्री अनिल चव्हाण व व्यवस्थापिका सौ अमृता चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
