सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचा २८ वा स्थापना दिवस १० शाखांच्या माध्यमातून ३०० कोटी व्यवसायाकडे दमदार वाटचाल

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचा २८ वा स्थापना दिवस १० शाखांच्या माध्यमातून ३०० कोटी व्यवसायाकडे दमदार वाटचाल

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचा २८ वा स्थापना दिवस १० शाखांच्या माध्यमातून ३०० कोटी व्यवसायाकडे दमदार वाटचाल

महिलांसाठी ‘लाडकी बहीण ठेव योजना’ ९.७५% आकर्षक व्याजदरासह

वाई : सहकार क्षेत्रात विश्वासार्ह आणि प्रगतीशील ओळख निर्माण केलेल्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई या संस्थेचा २८ वा स्थापना दिवस रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी साजरा होत आहे. स्थापनेपासून सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेने सातत्यपूर्ण प्रगती साधत १० शाखांच्या माध्यमातून तब्बल ३०० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.

संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख दरवर्षी उंचावत असून सध्या संस्थेच्या एकूण ठेवी १४८ कोटी रुपये इतक्या आहेत, तर १२९ कोटी रुपयांचे कर्जवाटप विविध घटकांना करण्यात आले आहे. पारदर्शक कारभार, विश्वासार्ह आर्थिक व्यवस्थापन, ग्राहकाभिमुख सेवा आणि सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेने सहकार क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे.

संस्थेने आपल्या ग्राहकांना आणि सभासदांना सुरक्षित व विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्याबरोबरच समाजाच्या विविध घटकांच्या प्रगतीसाठीही विविध योजना राबवल्या आहेत. विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने ‘लाडकी बहीण ठेव योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांनी ठेव ठेव केल्यास त्यांना ९.७५ टक्के इतका आकर्षक व्याजदर देण्यात येत आहे. सुरक्षित गुंतवणूक, जास्त परतावा आणि विश्वासार्ह सेवा यामुळे या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

तसेच ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे उत्कर्ष लिक्विडिटी प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत संस्थेच्या ९९.९१ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून संस्थेचा आर्थिक पाया मजबूत आणि स्थिर असल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सभासद आणि ठेवीदारांमध्ये संस्थेबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.

याबाबत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे यांनी सांगितले की,“उत्कर्ष पतसंस्था ही सभासद व ठेवीदारांच्या विश्वासावर उभी असलेली संस्था आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण ठेव योजने’चा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा. सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक व्याजदराच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.”

स्थापना दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष adv रमेश यादव तसेच संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्री मदनकुमार साळवेकर, डॉ. श्रीमती मंगला अहिवळे, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. शरद चव्हाण, श्री संजय वाईकर, श्री शरद चव्हाण , श्री वैभव फुले, श्री सागर मुळे, श्री भूषण तारू, श्रीमती नीला कुलकर्णी व श्रीमती अलका घाडगे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले. भविष्यातही आधुनिक सेवा, विश्वासार्ह आर्थिक व्यवहार आणि ग्राहकाभिमुख धोरणांच्या माध्यमातून संस्थेची प्रगती अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket