महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » Uncategorized » महाबळेश्वर: कोयना बॅकवॉटरमध्ये बुडून कोपरगावच्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

महाबळेश्वर: कोयना बॅकवॉटरमध्ये बुडून कोपरगावच्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

महाबळेश्वर: कोयना बॅकवॉटरमध्ये बुडून कोपरगावच्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

महाबळेश्वर:पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील वानवली (तर्फे सोळशी) येथे रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मॉर्निंग वॉक संपवून कोयना बॅकवॉटरच्या कडेला विरंगुळ्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संकेत विठ्ठल जाधव (वय २४, रा. सोनवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्याम साहेबराव चंद्रावत आणि मृत संकेत जाधव हे रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या हॉटेलबाहेर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर ते जवळच असलेल्या वानावली येथील कोयना बॅकवॉटरच्या कडेला जाऊन बसले.

सकाळी ७.३० च्या सुमारास श्याम चंद्रावत यांना पोहता येत असल्याने ते पाण्यात उतरले. त्यांना पाहून संकेत जाधवदेखील पाण्यात शिरला. पोहत असताना संकेत काठापासून सुमारे ५० ते ६० फूट आत गेला. मात्र, पुन्हा माघारी येत असताना काठापासून २० फूट अंतरावर असताना अचानक त्याने हातपाय हलवणे बंद केले आणि तो पाण्यात बुडू लागला.

संकेत पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच आरडाओरडा झाला. स्थानिक नागरिक आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याच्याकडून कोणतीही हालचाल झाली नाही. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्याला पुढील उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाबळे (बकल नं. २७२२) आणि पो. हवा. कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही घटना ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली असून, दुपारी १.२४ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात आणि त्याच्या मूळ गावी सोनवाडी (कोपरगाव) येथे शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket