Home » राज्य » शिक्षण » यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा सन्मान शिक्षणासाठी केलेल्या मेहनतीला मिळाली दाद; पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा सन्मान शिक्षणासाठी केलेल्या मेहनतीला मिळाली दाद; पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा सन्मान शिक्षणासाठी केलेल्या मेहनतीला मिळाली दाद; पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव

सातारा : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या २० विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीच्या मान्यतेस्वरूप शिक्षादान फाउंडेशन, बँक ऑफ बडोदा आणि प्युअर इंडिया ट्रस्ट यांच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या वेळी विद्यार्थ्यांचा गौरव यशोदा इन्स्टिट्यूट्स चे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांच्या मेहनतीची पावती आहे. अशा सन्मानामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी सातत्याने मेहनत करत आपल्या क्षमतांचा विकास करावा आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.”

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या मुलांच्या यशामुळे त्यांना अभिमान वाटत असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमासाठी संस्थेचे आणि संबंधित ट्रस्टचे आभार मानले. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षणात अधिक प्रगती करून भविष्यात समाजासाठी उपयुक्त ठरण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, संजय शेडगे, प्रशांत पाल – प्युअर इंडिया ट्रस्ट, राजस्थान, प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, रजिस्ट्रार डॉ. गणेश सुरवसे व प्राचार्य डॉ. विठ्ठल चवरे यांची उपस्थिती लाभली. 

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरव झाला असून इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि प्रोत्साहन यांचा संगम घडवून आणण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पस सातत्याने विविध उपक्रम राबवत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket