सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पाचगणी आठवडे बाजारातील समस्या सोडविण्याची मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशन पाचगणी शहरतर्फे मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन

पाचगणी आठवडे बाजारातील समस्या सोडविण्याची मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशन पाचगणी शहरतर्फे मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन

पाचगणी आठवडे बाजारातील समस्या सोडविण्याची मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशन पाचगणी शहरतर्फे मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन

पांचगणी (प्रवीण घाडगे – पाचगणी शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात नागरिक, व्यापारी तसेच ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने बाजार परिसरातील विविध समस्यांकडे पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पाचगणी शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात महाबळेश्वर, करहर, वाई, पांचवड परिसरातील व्यापारी तसेच पाचगणी व ग्रामीण भागातील नागरिक भाजीपाला, धान्य व अन्य साहित्य खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. सकाळी ९ ते सायंकाळपर्यंत बाजार परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते.

या पार्श्वभूमीवर बाजार परिसरातील दुचाकी वाहतुकीचे नियोजन करणे, व्यापाऱ्यांसाठी पुरेशा संख्येने शेडची संख्या,उंची वाढविणे, बाजार परिसरात महिला व पुरुष पोलिसांचा बंदोबस्त ठेवणे तसेच व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे, या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

ग्राहकांच्या सुरक्षिततेसह बाजारातील वाहतूक व व्यापाऱ्यांच्या सुविधांचा विचार करून नगरपरिषद प्रशासनाने या समस्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद लक्ष्मण माने, अनिल पवार, आंब्राळे,विजय  कासुर्डे,प्रकाश सकपाळ यांनी पाचगणी नगरपालिका सीईओ पंडित, व पाचगणी शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket