Home » राज्य » शेत शिवार » मेढा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी १५.४९ कोटी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; मेढावासीयांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार     

मेढा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी १५.४९ कोटी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; मेढावासीयांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार     

मेढा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी १५.४९ कोटी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; मेढावासीयांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार     

भुईंज 🙁 महेंद्रआबा जाधवराव) सातारा- जावली मतदारसंघातील मेढा नागरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, नागरिकांचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून मेढा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी शासनाच्या नगरोत्थान योजनेतून तब्बल १५ कोटी ४९ लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे मेढावासीयांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. 

        मेढा नगरपंचायतीची पाणीपुरवठा योजना जुनी झाली आहे तसेच येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असते. नागरिकांची पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सुटावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार नगरोत्थान महाभियानांतर्गत मेढा नगरपंचायतचा पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांच्या तांत्रिक मान्यतेसह नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. 

         मेढा नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाला १५ कोटी ४९ लाख रुपये निधी मिळाला असून मेढावासीयांना सुधारित पाणीपुरवठा योजना मिळणार आहे. यामध्ये जुन्या पाणीपुरवठा योजनेचे मजबुतीकरण करतानाच सर्वत्र नवीन जलवाहिन्या टाकणे, जॅकवेल आणि जल शुद्धीकरण केंद्र दुरुस्ती व आधुनिकीकरण करणे, पाणी उपशासाठी सोलर पॅनल बसवणे (त्यामुळे विजेसाठीच्या खर्चाची बचत होणार), नवीन मोटारी आणि पम्पिंग मशिनरी बसवणे तसेच संपूर्ण पाणी वितरण व्यवस्था नवीन टाकणे हि कामे केली जाणार आहेत. नवीन पाणीपुरवठा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने मेढावासीयांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल तमाम मेढावासीयांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket