अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » आत्याचे दागिने जबरीने लंपास करणाऱ्या भाच्याकडून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत; मेढा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

आत्याचे दागिने जबरीने लंपास करणाऱ्या भाच्याकडून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत; मेढा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मेढा पोलीस ठाणे यांची कामगीरी आत्याचे दागीने जबरीने घेवुन गेलेल्या भाच्याकडून गुन्ह्यातील दागीने हस्तगत

मेढा प्रतिनिधी -मौजे करहर ता.जावली जि. सातारा गावच्या रहिवाशी रोहिणी बबन दुधाने ह्या दिनांक-२९/०४/२०२६ रोजी सायंकाळी ७.४५ वा.चे सुमारास किचनमध्ये भांडी घासत उभ्या असताना त्यांचा भाचा आरोपी अजिंक्य सुरेश पांचाळ वय-२७ वर्षे, मुळ रा. करहर ता. जावली जि. सातारा हल्ली रा. पाचगणी ता. महाबळेश्वर जि. सातारा याने पाठीमागून येवून फिर्यादीस धक्का देवुन दुखापत करून त्यांचे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसुत्र व सोन्याचे डोरले असे दागीने जबरीने ओढुन तोडून घेवुन गेलेबाबत मेढा पोलीस ठाणेस आरोपीविरूद्ध गुन्हा रजि.नं.१०२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११९ (१) प्रमाणे दिनांक-०४/०५/२०२६ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला होता.

सदर घटनेच्या अनुशंगाने मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक साो सातारा, मा.श्रीमती वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधीक्षक साो सातारा, मा. श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांनी चोरीस गेलेले दागीने आरोपीकडून हस्तगत करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे नमुद गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य सुरेश पांचाळ यास गुन्हा दाखल होताच त्याच दिवशी तात्काळ अटक करून मा. न्यायालयात हजर ठेवले असता मा. न्यायालयाने त्याची दिनांक-०८/०५/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. मंजूर पोलीस कस्टडी कालावधीत आरोपीत मजकुर याचेकडे कसोशीने तपास करून तसेच त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडून त्याने यातील फिर्यादी यांचे जबरीने ओढून तोडून घेवुन गेलेले सोन्याचे मनी मंगळसुत्र व सोन्याचे डोरले असे दागीने १००% हस्तगत करणेत आलेले असून सदर गुन्ह्याचा तपास मेढा पोलीस ठाणेचे व्हि. वाय. गंगावणे श्रेणी पोलीस उप-निरीक्षक हे करीत आहेत. सदर कारवाई मध्ये मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक साो सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधीक्षक साो सातारा, मा.श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर पाटील, सहा. पोलीस निरीक्षक मेढा पोलीस ठाणे व श्रेणी पोलीस उप-निरीक्षक व्हि. वाय. गंगावणे, पो.हवा. अनिल सावंत ब.नं.२२०३, पो.हवा. विजय माळी ब.नं.१३६५, पो.हवा.माने ब.नं.७२८, पो.ना. धिरज बेसके ब.नं.२६८४, पो.कॉ. सनी काळे ब.नं.२५२६, पो.कॉ. अनिकेत दिक्षीत ब.नं.७३ यांनी कारवाई सहभाग घेतला आहे. सदर कामगीरी बाबत मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक साो सातारा, मा.श्रीमती वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधीक्षक साो सातारा, मा.श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांनी सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket