अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » 1.5 ते 3% कमिशनच्या लालचात बँक खाती दिली; आंतरराज्यीय सायबर टोळीचा सातारा पोलिसांकडून पर्दाफाश

1.5 ते 3% कमिशनच्या लालचात बँक खाती दिली; आंतरराज्यीय सायबर टोळीचा सातारा पोलिसांकडून पर्दाफाश

1.5 ते 3% कमिशनच्या लालचात बँक खाती दिली; आंतरराज्यीय सायबर टोळीचा सातारा पोलिसांकडून पर्दाफाश

सायबर पोलीस ठाणे यांची कारवाई स्वत:च्या व इतर व्यक्तींच्या नावावरील बँक खाती, व म्युल अकाऊंट चालवून ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणारी 4 आरोपींची टोळी जेरबंद करुन 2,34,750/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 

श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर सायबर फसवणूक करणारे संघटीत पध्दतीने गुन्हे करत असून निरपराध नागरीकांना ऑनलाईन माध्यमातून फसवणूक इन्व्हेस्टमेंट स्कीम, पार्ट टाईम जॉब ऑफर, डिजीटल ॲरेस्ट, तसेच विविध प्रकारच्या अमिषाद्वारे पैसे हस्तांतरीत करणारी टोळी कार्यरत असून त्यांची माहिती प्राप्त करुन कारवाई करण्याच्या सुचना सायबर पोलीस ठाणेस दिल्या आहेत.

राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCCRP) वर मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सायबर गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या बनावट खात्यांचा मागोवा घेतला जात होता. दि. २०/०८/२०२६ रोजी सायबर ठाण्याचे पो. कॉ. ओंकार डुबल यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोरेगाव येथील काही तरुण सर्वसामान्य नागरिकांना १.५ ते ३% कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती, ATM/डेबिट कार्ड्स व SIM कार्ड्स गोळा करत आहेत. सदर खाती पुढे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम प्राप्त करण्यासाठी व हस्तांतरित (Layering) करण्यासाठी दिली जात आहेत, अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीची खातरजमा करून सायबर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळी, LHC सुप्रिया रोमन, HC संदीप पाटील, PC ओंकार डुबल, PC रणजीत कुंभार, PC प्रशांत मोरे, LPC जुनघरे व LPC पवार या पथकाने पंचांच्या उपस्थितीत कोरेगाव येथील तीळगंगा नदी पुलाजवळ सापळा रचला.

एक डमी खातेदार तयार करून ATM कार्ड स्वीकारण्यासाठी आलेल्या इसमास रंगेहात ताब्यात घेतले. नमुद इसमाकडे सखोल विचारपूस करुन त्याचे आणखी 3 साथिदार यांना सायबर पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता नमुद तपासामध्ये आरोपींच्या ताब्यातील व त्यांनी पुरवलेल्या बँक खात्यांवर (उदा. IDBI बँक गणेश सप्लायर्स खाते, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक इत्यादी) आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यांसारख्या विविध राज्यांमधून ३५ पेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे Telegram व Instagram द्वारे मुख्य सायबर सूत्रधारांच्या संपर्कात होते. नमुद 4 आरोपींच्याकडून मोबाईल हँडसेट्स (५ नग): Apple iPhone 15 Pro, Motorola edge 60 stylus, Vivo Y31, Vivo Y200, Samsung S20FE, Realme UI 13+., विविध बँकांचे ८ Debit/ATM कार्ड्स, ४ जादा SIM कार्ड्स आणि [Aadhaar Redacted], PAN कार्ड व इतर कागदपत्रे तसेच १ रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी (MH-11-DP-4336) आणि ₹३३,६५०/- रोख रक्कम असा एकूण 2,34,750/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. नमुद इसमांचे विरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत.

 सातारा जिल्हयातील नागरीकांनी “कोणीही पैशांच्या वा कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे किंवा नातेवाईकांचे बँक खाते, ATM कार्ड, पासबुक किंवा SIM कार्ड अनोळखी अथवा इतर व्यक्तींना वापरण्यासाठी देऊ नये. असे केल्यास तुम्ही नकळत आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारीचे भागीदार बनू शकता व तुमच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असा प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.” असे आवाहन श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा यांनी केले आहे.

श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळी, LHC सुप्रिया रोमन, HC संदीप पाटील, PC ओंकार डुबल, PC रणजीत कुंभार, PC प्रशांत मोरे, LPC जुनघरे व LPC पवार यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket