अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » सतीश ओंबळे यांच्या पाठपुराव्याला यश; महाबळेश्वरसाठी ₹1.15 कोटींचा निधी मंजूर

सतीश ओंबळे यांच्या पाठपुराव्याला यश; महाबळेश्वरसाठी ₹1.15 कोटींचा निधी मंजूर

सतीश ओंबळे यांच्या पाठपुराव्याला यश; महाबळेश्वरसाठी ₹1.15 कोटींचा निधी मंजूर

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ₹75 लाख, दोन रुग्णवाहिकांसाठी ₹40 लाखांची शासनाची मंजुरी

महाबळेश्वर :(प्रतिनिधी)उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सातारा उपजिल्हाप्रमुख सतीशजी ओंबळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, महाबळेश्वर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल ₹1 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसराच्या विकासासाठी ₹75 लाख तर महाबळेश्वर नगरपरिषदेस दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदीसाठी ₹40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नगर विकास विभागाने २५ जून २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, वैभवस्थूपूर्ण योजनेअंतर्गत महाबळेश्वर नगरपरिषद येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकातील विकासकामांसाठी ₹75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटकांसाठी आकर्षणाचे आणखी एक केंद्र निर्माण होणार आहे.

याच दिवशी काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे महाबळेश्वर नगरपरिषदेस दोन रुग्णवाहिका खरेदीसाठी ₹40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रुग्णवाहिकांमुळे महाबळेश्वर व परिसरातील नागरिकांसह लाखो पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सेवांचा मोठा लाभ होणार आहे.

महाबळेश्वर शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या या दोन्ही कामांबाबत सतीशजी ओंबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

याबाबत बोलताना सतीशजी ओंबळे यांनी सांगितले की, “महाबळेश्वरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी यापुढेही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असून शहरासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.”महाबळेश्वरच्या विकासाला चालना देणाऱ्या या निधी मंजुरीबद्दल शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket