तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने
Home » राज्य » शिक्षण » ८ लाख लाडक्या बहिणींना फक्त ५०० चा हफ्ता!

८ लाख लाडक्या बहिणींना फक्त ५०० चा हफ्ता!

८ लाख लाडक्या बहिणींना फक्त ५०० चा हफ्ता!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या राज्यातील तब्बल ८ लाख महिलांना आता १५०० रुपयांऐवजी दर महिन्याला केवळ ५०० रुपयांचा हफ्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ८ लाख महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्याने त्यांना १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या छाननीत ८ लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी महासन्मान निधीची मदत मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १ हजार रुपयांची कपात करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणा-या ८ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे ५०० रुपयेच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून पैसेही वसूल करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कोणत्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नसून, वसुली केलेली नाही, निष्कारण भ्रम पसरवला जात असल्याचे म्हटले.

आधी सरसकट लाभ, आता निकष लावलेविधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला. यात पात्र, अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या महिलांनी अर्ज केले. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणा-या महिलांची कागदपत्र पडताळणी केली. यातून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळले.

लाडक्या बहिणींच्या संख्येत दरमहा घट!ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी २.६३ कोटी अर्ज आले होते. तपासणी प्रक्रियेनंतर ही संख्या ११ लाखांनी कमी झाली. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत २.५२ कोटी महिला लाभार्थ्यांना योजनेचे पैसे मिळाले. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ही संख्या २.४६ लाखावर आली. यातूनही आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणा-यांना १५०० रुपयाऐवजी फक्त १ हजार रुपये मिळणार आहेत.

म्हणून महिलांना ५०० रुपयांची मदतइतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणा-या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७,७४,१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई) तडीपार इसमास जेरबंद करुन

Live Cricket