सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » ठळक बातम्या » आरोग्य » हृदयविकार रुग्णांसाठी ८ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी ८ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी ८ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य यामुळे सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. सध्या हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. जर आपल्याला वारंवार छातीमध्ये दुखणे, घाम येणे, चक्कर येणे, धाप लागणे, गुदमरणे, साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशा प्रकारच्या गोष्टींची तक्रार आहे त्यांनी आपली तपासणी करुन घेणे जरुरीची आहे.

यासाठी अॅन्जिओग्राफी करुन घेणे आवश्यक ठरते. अॅन्जिओग्राफीमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये काही दोष, अडथळा आहे का हे कळून येते. अॅन्जिओग्राफी किंवा आर्टिरिओग्राफी एक वैद्यकीय इमेजिंग तंत्र आहे. ज्याचा उपयोग रक्तवाहिन्या आणि शरीराच्या अवयवांच्या आतील किंवा लुमेनची कल्पना करण्यासाठी केला जातो. याकरिता हृदयविकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयोगी पडते.

सातारा, रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस येथे गुरूवार, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ आणि मिशन हॉस्पिटल, वाई येथे १२ ते २ यावेळेत रुबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. तरी रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऑपरेशन्स मॅनेजर श्री. स्वप्निल जंगम यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket