Home » Uncategorized » स्फूर्ती व प्रेरणेचा दीपस्तंभ.. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

स्फूर्ती व प्रेरणेचा दीपस्तंभ.. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

१५ ऑक्टोंबर भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमित्त.

स्फूर्ती व प्रेरणेचा दीपस्तंभ.. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

भारतमातेचे थोर सुपुत्र भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्र अभिमानाचे व सामर्थ्य विचारांचे प्रतीक म्हणून संपूर्ण विश्वात त्यांची प्रतिमा आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले. जिद्द चिकाटी आत्मविश्वास व सकारात्मक विचारांच्या जोरावर त्यांनी संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे कार्य करून दाखविले. राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा व अभिमान या विचाराची बांधिलकी जपत त्यांनी भारताचा तिरंगा जगात डौलाने फडकविला.या महान शास्त्रज्ञाने राष्ट्राच्या विज्ञान तंत्रज्ञान व अवकाश क्षेत्रात नवक्रांती घडवून राष्ट्राला जागतिक स्तरावर सन्मान मिळवून दिला. विशाल दृष्टिकोन, वैचारिक बैठक, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची आस, अध्यात्मिक बैठक, दूरदृष्टी व नव संशोधनाची ओढ लागलेल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्रनिष्ठा व भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्राधान्य दिले. या महान व्यक्तिमत्त्वाचा १५ ऑक्टोंबर हा जन्मदिन महाराष्ट्र शासनातर्फे वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.यानिमित्ताने श्रीरंग काटेकर सातारा यांचा विशेष लेख…

सूर्याप्रमाणे तळपणारे व चंद्राप्रमाणे शितल होऊन भारतीयांमध्ये मायेचा ओलावा प्राप्त करणारे भारतरत्न व थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशासाठी दिलेले योगदान व केलेले कार्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी असंख्यजन योगदान देत आहेत. राष्ट्रप्रवाहात विकसित विचारांची गंगा प्रत्येकाच्या मनामनामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशभर भ्रमंती करून भारतीयांमध्ये आत्मविश्वास जागविला.आपल्या बौद्धिक कौशल्याने देशाला जागतिक स्तरावर खऱ्या अर्थाने स्थान मिळवून दिले.कल्पक दूरदृष्टी व संयमी विचारातून नवा इतिहास निर्माण करणारे भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आयुष्यभर निस्वार्थी भावनेने आपले जीवन जगले. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर विद्यार्थ्यांना व्याख्याने देऊन अनमोल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांमध्ये विशेष रुची असणारे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पहा पण ती सत्यात उतरवण्यासाठी परिश्रम करा हा मंत्र देऊन त्यांनी नव्या पिढीला खऱ्या अर्थाने प्रेरणेचे बळ दिले आहे. 

सत्य सामर्थ्य स्फूर्ती व प्रेरणेचा महासागर असलेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे चालते बोलते ज्ञानाचे विश्वकोश होते. वैचारिक प्रगल्भता आणि विज्ञान तंत्रज्ञान व अवकाश क्षेत्रातील अद्यावत सखोल ज्ञान यामुळे भारताला विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणे शक्य झाले. ज्ञानदानातून समृद्ध समाज घडवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत वेचले. धर्म,जात,पंथ या पलीकडे जाऊन सर्व धर्मियांचा आदर व सन्मान करण्याच्या त्यांच्या वृत्तीतून सामाजिक समतेचा मंत्रच त्यांनी संपूर्ण भारतीयांना दिला. राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून बलशाली राष्ट्राच्या स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व देशाला दिले.समाज परिवर्तनाच्या लढाईत विज्ञान तंत्रज्ञान बरोबरच नैतिक मूल्य शिक्षण हे खूप महत्त्वाचे ठरते या संस्कारातून घडणारे मनुष्यबळ राष्ट्र प्रगतीला व उत्कर्षाला पूरक ठरते ही भावना त्यांनी मनात ठेवून अनेकांना यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळेच आज त्यांना संपूर्ण भारतीयांच्या मला मनात श्रद्धेचे स्थान मिळविले आहे. 

 श्रीरंग काटेकर, सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket