Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » सेवा संकल्प अभियानांतर्गत करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास योजनेबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास योजनेबाबत मार्गदर्शन

सेवा संकल्प अभियानांतर्गत करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास योजनेबाबत मार्गदर्शन

सातारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, सातारा येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन व शासकीय योजनांविषयक माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, रोजगार मेळावे, इंडिया स्कील कॉम्पिटिशन तसेच एनसीएस पोर्टल आणि नाविन्यता उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांचा भविष्यातील रोजगार प्रवास सुकर व्हावा व त्यांना थेट संधी मिळाव्यात यासाठी याप्रसंगी उपस्थितांची शासनाच्या महास्वयं पोर्टलवर प्रत्यक्ष नोंदणी करून घेण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket