अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क

वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क

वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा

दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क

मुंबई- राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर शुल्क आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र स्टेट पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयूसी शुल्काच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीचा अभ्यास करण्यासाठी परिवहन विभागाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. समितीने अन्य राज्यांमधील पीयूसी तपासणीचे प्रचलित दर तसेच विविध बाबींचा अभ्यास करून दरवाढीबाबत अहवाल सादर केला होता.

सुधारित दरानुसार दुचाकी वाहनांसाठी पीयूसी तपासणी शुल्क ५० रुपयांवरून ६० रुपये, पेट्रोलवरील तिनचाकी वाहनांसाठी १०० रुपयांवरून १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी १२५ रुपयांवरून १५० रुपये, तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात आले आहे.

सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सुधारित दरांची अंमलबजावणी सर्व पीयूसी केंद्रांवर होत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, विहित दरांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी वायुवेग पथकांनाही आवश्यक सूचना देण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket