महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्ते मोकळे करणार – आमदार मनोजदादा घोरपडे कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंगचा घवघवीत यशाचा शतकी टप्पा जीएनएम तृतीय वर्षाचा निकाल शंभर टक्के; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावा- डॉ पी कुलकर्णी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! महाबळेश्वरच्या विकासकामांना गती; मंत्री मकरंद (आबा) पाटील यांचे सकारात्मक आश्वासन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्ते मोकळे करणार – आमदार मनोजदादा घोरपडे

वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्ते मोकळे करणार – आमदार मनोजदादा घोरपडे

वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्ते मोकळे करणार – आमदार मनोजदादा घोरपडे

कराड प्रतिनिधी -कराड उत्तर ;सातारा – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वन विभागाच्या हद्दीत येणारे अनेक रस्ते तांत्रिक अडचणींमुळे बंद आहेत. या रस्त्यांअभावी शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व रस्ते तातडीने मोकळे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.

यासंदर्भात सातारा येथील वन विभागाच्या कार्यालयात आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस वन विभागाचे जिल्हा अधिकारी अमोल सातपुते, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, M.S.E.B विभाग, जलसंधारण विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत हेळगाव-हणबरवाडी, निगडी खिंडीतील पावकता मंदिराकडे जाणारा वन हद्दीतील रस्ता, गिरजाशंकरवाडी-खोडजाईडी रस्ता, बेलवाडी-अंभेरी रस्ता, शामगाव-किवळ रस्ता, जंगलवाडी-कोरीवळे रस्ता,वडोली निळेश्वर येथील शेत रस्ता,मानेवाडी-पिलानी रस्ता, सडा -वाघापूर ते तारळे  M.S.E.B लाईनचा विषय – मसूर M.S.E.B सबस्टेशन, चिखली नवीन सबस्टेशन,अंतवडी एम आय टॅंक डिचोली पुनर्वसन,मळे पुनर्वसन,अंतवडी-शहापूर रस्ता,यासह वन विभागाशी संबंधित इतर अनेक प्रलंबित कामांवर चर्चा करून ती तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार घोरपडे यांनी दिल्या.

त्याचबरोबर सध्या सर्वदूर बिबट्याचा वावर वाढला असून, नागरिकांच्या व पाळीव प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना देखील आमदार घोरपडे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जयश्री जाधव, लता पाटील, माधव पाटील, संदीप पानसकर शरद पवार संजय यादव धोंडीबा कोळेकर कोंडीबा कोळेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान

महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान तीन शैक्षणिक संस्थांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, पॉक्सो, बालविवाह, हुंडा प्रतिबंध व POSH

Live Cricket