Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न

लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न

लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न

​सातारा प्रतिनिधी –महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा अंतर्गत राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र व महिला व बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजना बाल विकास नागरी प्रकल्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बीट-लोणंद येथे नव चेतना बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

​या मेळाव्यात महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. केंद्रामार्फत हिंसाग्रस्त महिलांना दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधा जसे की समुपदेशन, वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला व तात्पुरत्या राहण्याची सोय यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेसाठी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१, चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ आणि सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० या टोल फ्री क्रमांकांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.

​या प्रसंगी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, पोक्सो कायदा, अनाथ प्रमाणपत्र आणि बालविवाह प्रतिबंध कायदा या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींनी आत्मविश्वासाने सक्षम झाले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

​या कार्यक्रमास महिला सक्षमीकरण केंद्र विभागातील मृण्मयी जाधव, सोनाली देसाई, तनया घोरपडे , मानसी शिर्के, अंगणवाडी बीट, ज्ञानेश्वर यादव, यांच्यासह परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket