सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ऊसतोड हंगामात सतर्क राहा; मानव-वन्यजीव संघर्ष टाळा महा कॅम्पा निधीतून व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दारूसाठी पत्नीचा खून करणाऱ्या निर्दयी पतीला जन्मठेप; उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला मोठे यश तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home » राज्य » शेत शिवार » लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार

लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार

लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार

सातारा, दि. २६: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सावली (ता. जि. सातारा) येथे आज लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा तसेच ग्रामपंचायत सावली आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हे काम करण्यात आले.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग भूजल पुनर्भरणासाठी व्हावा, तसेच परिसरातील जलसंधारणाला चालना मिळावी, या उद्देशाने वनराई बंधाऱ्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. या कामांतर्गत सर्वप्रथम बंधारा उभारण्यासाठी निश्चित केलेल्या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानंतर सिमेंटच्या गोण्यांमध्ये वाळू व स्थानिक उपलब्ध साहित्य भरून वनराई बंधाऱ्याची मजबूत बांधणी करण्यात आली. यासोबतच जुन्या व पडझड झालेल्या वनराई बंधाऱ्याची स्वच्छता करून त्यातील गाळ काढण्यात आला. बंधाऱ्यातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी माती, दगड आणि प्लॅस्टिक कागदाचा वापर करण्यात आला. 

या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. बंधाऱ्याच्या उभारणीसाठी गोण्या, वाळू, दगड यांसारख्या स्थानिक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केल्यास कमी खर्चात पाणी अडविणे व जिरविणे शक्य होते. तसेच गावपातळीवर जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांमध्ये सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण होते. सावली येथील लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचा उपक्रम हा जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

भूजल संवर्धनासाठी शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास जलसंधारणाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळू शकते. त्यामुळे गावातील नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला चालना द्यावी, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि डिजिटल

Live Cricket