मांडवे धरणाचे पाणी पूजन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते संपन्न; उरमोडीचे पाणी मांडवे तलावात येणार
मांडवे, ता. सातारा :येथील मांडवे धरण यंदा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे पाणी पूजन कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
मांडवे धरण हे पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून या धरणामुळे मांडवे, सोनापूर आणि निनाम या तीन गावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा होतो. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने धरण लवकर भरले आहे.
यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, उरमोडी धरणाचे पाणी मांडवे तलावात सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात पाऊस कमी पडल्यास किंवा उन्हाळ्यात पाण्याची गरज भासल्यास उरमोडी धरणाचे पाणी मांडवे तलावामध्ये सोडता येणार आहे.
“सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्याने उरमोडी धरणाच्या भाटमरळी योजनेतुन पाणी मांडवे तलावात सोडण्यात येणार असल्यामुळे निनाम, सोनापूर, मांडवे आदी गावांमध्ये बागायती क्षेत्र निर्माण होऊन येथील दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे.” – आ. मनोजदादा घोरपडे
या पाणी पूजन सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पुजाताई मोरे, पंचायत समिती सदस्या,प्रमिलाताई सुतार, सरचिटणीस गणेश जाधव, माजी पं.स. सदस्य विजयाताई गुरव, विलास कदम, माजी पं. सदस्य माधवराव गुरव सर, माधवराव जाधव, संजय महाडिक, राजा पवार, निलेश जाधव, संजय जाधव, जोतिबा जाधव, पांडुरंग पवार, नंदू पाटील, दत्तात्रय ढाणे, बबन पवार आप्पा, लहू पवार फौजी, बबन देशमुख, नितीन पवार, जहागीर महाडिक, दिलीप ढाणे, गणेश ढाणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





