मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावा; अपघात टाळण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची जनजागृती मोहीम रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर: सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा; तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

महाबळेश्वर: सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा; तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

महाबळेश्वर: सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा; तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

​महाबळेश्वर (प्रतिनिधी):मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महाबळेश्वर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के आणि पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांना हे निवेदन देऊन मराठा समाजाच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत समाजाचा ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला.

​मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठिकठिकाणाहून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव एकत्र आले. त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी हे निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे समाजाच्या विविध मागण्यांवर आणि आंदोलनाला असणाऱ्या पाठिंब्यावर भर देण्यात आला.

​या प्रसंगी समाजातील प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दिलीप वागदरे, राजाभाऊ गुजर, अंकुश बावळेकर, रामदास जाधव, अशोक शिंदे, राजेंद्र पवार, सूर्यकांत जाधव, दीपक बावळेकर, सचिन गुजर, राहुल भोसले, संतोष चिकणे, निलेश धनावडे, श्रीकांत बावळेकर, गणेश जाधव, गणेश बावळेकर, संजय बावळेकर, उमेश बावळेकर, शुभम बावळेकर, धनंजय बावळेकर, बाळू जाधव, संदेश गुजर यांच्यासह शहर व तालुक्यातील इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी महाबळेश्वरचा सकल मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा सूर या वेळी उपस्थित समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात मेढा : जावळी तालुक्यातील डांगरेघर येथील मालकी क्षेत्रात विनापरवाना खैर वृक्षतोड

Live Cricket