सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरमध्ये वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून जनजागृती फेरी

महाबळेश्वरमध्ये वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून जनजागृती फेरी

महाबळेश्वरमध्ये वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून जनजागृती फेरी

​महाबळेश्वर:वन विभागाच्या वतीने महाबळेश्वर वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेठ गंगाधर माखरिय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शहरातून जनजागृती फेरी काढली.  

जनजागृती फेरीचा मार्ग आणि संदेश

ही फेरी एसटी बसस्थानक परिसरातून सुरू होऊन मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत हायस्कूलच्या प्रांगणात पोहोचली. फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेश लिहिलेले फलक (प्लेकार्ड्स) धरले होते. “निसर्ग संपत्तीचे संरक्षण करा”, “वन्यजीव वाचवा”, “निसर्ग वाचवा” आणि “पर्यावरणाचे रक्षण करा” असे महत्त्वपूर्ण संदेश देत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वन्यजीव संरक्षणाबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या.  

​अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग

फेरीच्या सांगता प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांनी वन्यजीव सप्ताहाचा मुख्य उद्देश स्पष्ट करून उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  ​हा उपक्रम उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रोंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबवण्यात आला. या कार्यक्रमात वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे, संजय कमलेकर, लहू राऊत, करूणा जाधव यांच्यासह वनरक्षक आणि वन विभागाचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket