सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » Uncategorized » मतदार नोंदणीसाठी शनिवार-रविवारी विशेष मोहीम सातारा जिल्ह्यातील ३,१६६ मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

मतदार नोंदणीसाठी शनिवार-रविवारी विशेष मोहीम सातारा जिल्ह्यातील ३,१६६ मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

मतदार नोंदणीसाठी शनिवार-रविवारी विशेष मोहीम सातारा जिल्ह्यातील ३,१६६ मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

सातारा  : मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी प्रक्रियेंतर्गत (एसआयआर) मतदारांच्या नोंदणीतील त्रुटी दूर करण्यासाठी तसेच पात्र नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात येत्या १० व ११ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३,१६६ मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असून, मतदारांना यादीतील नाव, पत्ता आदी तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी अर्जही दाखल करता येणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी प्रक्रियेत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, राज्याची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विशेष सखोल तपासणी मोहिमेत जुळणी न झालेले मतदार किंवा तार्किक विसंगती आढळलेल्या जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ९६ मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आता मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. नोटीस व त्याचे उत्तर व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, नव्याने मतदार नोंदणीसाठी नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये मतदारांना मतदार यादीतील नाव व पत्त्यात सुधारणा करण्यासाठी अर्ज करता येणार आहेत.

 

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेऊन पात्र विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शिबिरांमधून किती विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली, याचा तपशीलही सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पात्र नवयुवक व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे आणि लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket