बोंडारवाडी धरणाचे प्रणेते कै. विजयराव मोकाशी यांना रविवारी अभिवादन; वरोशीत विविध कार्यक्रम
केळघर- बोंडारवाडी धरण कृती समितीचे संस्थापक जलनायक कै. विजयराव मोकाशी यांच्या चतुर्थ स्मृतिदिनामित्त रविवारी (ता:२०)वरोशी येथे बोंडारवाडी धरण कृती समितीचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक आदिनाथ ओंबळे यांनी दिली.
मोकाशी यांच्या स्मृतिदिनामित्त रविवारी सकाळी दहा ते एक या वेळेत सर्व रोग निदान शिबीर होणार आहे.दुपारी एक वाजता आदरांजली कार्यक्रम होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
यावेळी कृती समितीच्या पुढील वाटचालीसाठी विचारविनिमय होणार असून जावळी तालुक्यातील नागरिक, शेतकरी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीचे वतीने करण्यात आले आहे.





