सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न

पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न

पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया, पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

श्रीमती तेली – उगले म्हणाल्या, निवडणूक लढवित असलेले उमेदवार आणि पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावा. तसेच या निवडणुकीत मतदान पसंतीक्रम नोंदवून करण्यात येत असल्याने मतपत्रिका अवैध ठरू नये यासाठी याविषयी मतदार जागृती करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आदर्श आचारसंहिता, निवडणूक विषयक विविध परवानग्या, मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने प्रतिनिधींची नेमणूक, मतदार संख्या आदींच्या अनुषंगाने उमेदवार आणि पक्ष प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन निवडणूक निरीक्षक आणि श्रीमती तेली- उगले यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket