नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पो मंडप उभारणीचा शुभारंभ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते संपन्न

पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पो मंडप उभारणीचा शुभारंभ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते संपन्न

पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पो मंडप उभारणीचा शुभारंभ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते संपन्न

सातारा (महेंद्रआबा जाधव)-सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी मॅरेथॉनचे १५ वे वर्ष असून, देशभरातून सुमारे १० हजार धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे.

यावर्षीचा ‘मॅरेथॉन एक्स्पो’ शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर आणि शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात आयोजित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सोमवार, दि.२४ ऑगस्ट रोजी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व भूमिपूजन करून करण्यात आला.

यावेळी पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे आणि सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांनीही श्रीफळ वाढवून मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी सातारा रनर्स फाउंडेशनचे संचालक अभिषेक भंडारी तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार श्री महेंद्र (आबा) जाधव उपस्थित होते.

यावर्षी देखील एक्स्पोसाठी ‘जर्मन हँगर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या मंडपाचे संकल्पनात्मक डिझाईन स्वतः संयोजन समितीचे अध्यक्ष तथा आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांनी केले असून, त्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या धावपटू आणि नागरिकांना प्रशस्त, सुरक्षित व आरामदायी वातावरण मिळावे याचा विशेष विचार या डिझाईनमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मंडप संपूर्ण वातानुकूलित असणार आहे.

या मंडप उभारणीची जबाबदारी मंडप कॉन्ट्रॅक्टर श्री भाऊ भोसले व श्री जितेंद्र भोसले यांनी स्वीकारली आहे.

या एक्स्पोमध्ये देशभरातील विविध नामांकित संस्था व कंपन्या आपल्या उत्पादनांचे व सेवांचे स्टॉल्स उभारणार आहेत. यामध्ये स्पोर्ट्स, रनिंग, फिटनेस, आरोग्य, पोषण तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादने व उपक्रमांची माहिती धावपटू आणि नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे धावपटूंसोबतच फिटनेस व आरोग्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठीही हा एक्स्पो विशेष आकर्षण ठरणार आहे.

मॅरेथॉनच्या दोन दिवस आधी होणारा हा एक्स्पो केवळ विविध स्टॉल्सचे प्रदर्शन नसून, रनिंग, फिटनेस, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. देशभरातून साताऱ्यात दाखल होणाऱ्या धावपटूंमुळे एक्स्पोमध्ये मॅरेथॉनपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, सातारकर नागरिकांनाही या उत्साहाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

‘जर्मन हँगर’ तंत्रज्ञानामुळे उभारण्यात येणारा हा भव्य आणि संपूर्ण वातानुकूलित एक्स्पो मंडप सातारकरांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे सातारकर नागरिकांनी या भव्य एक्स्पोला आवर्जून भेट देऊन देशभरातून सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या उत्साहाचा अनुभव घ्यावा, तसेच विविध स्टॉल्स, उत्पादने व उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ अविनाश शिंदे, जॉईंट रेस डायरेक्टर डॉ दिपक बनकर, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर आणि खजिनदार राहुल घायताडे यांनी संयुक्तपणे केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket