महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान गणेशोत्सवा निमित्त कलम 36 लागू वन विभागाच्या हद्दीतील प्रलंबित रस्ते मोकळे करणार – आमदार मनोजदादा घोरपडे कनिष्का स्कूल ऑफ नर्सिंगचा घवघवीत यशाचा शतकी टप्पा जीएनएम तृतीय वर्षाचा निकाल शंभर टक्के; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावा- डॉ पी कुलकर्णी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! महाबळेश्वरच्या विकासकामांना गती; मंत्री मकरंद (आबा) पाटील यांचे सकारात्मक आश्वासन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! महाबळेश्वरच्या विकासकामांना गती; मंत्री मकरंद (आबा) पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश! महाबळेश्वरच्या विकासकामांना गती; मंत्री मकरंद (आबा) पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

महाबळेश्वर शहराच्या प्रलंबित व नवीन विकासकामांना गती देणार; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांचे सकारात्मक आश्वासन महाबळेश्वर:

महाबळेश्वर प्रतिनिधी -महाबळेश्वर शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि विविध लोकोपयोगी प्रकल्पांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंद (आबा) पाटील यांची महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे व नगरसेवक यांनी सदिच्छा भेट घेतली.

या बैठकी दरम्यान महाबळेश्वर शहरात सुरू असलेल्या व आगामी काळातील विविध विकासकामां बाबत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली.बैठकीत महाबळेश्वर शहरात सध्या चालू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आला. तसेच, आगामी काळातील प्रलंबित आणि अत्यंत महत्त्वाच्या नवीन विकासकामांना गती मिळावी, यासाठी आवश्यक असणाऱ्या निधी मंजुरीचे अधिकृत पत्र मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना सुपूर्द करण्यात आले.या महत्त्वपूर्ण बैठकी प्रसंगी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे व बांधकाम सभापती श्री. अफजल सुतार, स्वच्छता सभापती श्री.संजय जंगम आणि शिक्षण सभापती श्री.रोहित ढेबे प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा करत, मंत्री महोदयांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आणि आवश्यक असणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आमची संपूर्ण टीम पूर्ण ताकदीने आणि कटिबद्धतेने कार्यरत राहील, असा विश्वास नगराध्यक्ष, सुनिल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान

महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांची माहिती; महाबळेश्वरमध्ये जनजागृती अभियान तीन शैक्षणिक संस्थांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, पॉक्सो, बालविवाह, हुंडा प्रतिबंध व POSH

Live Cricket