Home » Uncategorized » दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

सातारा -पशुवैद्यकीय चिकित्सालय, परळी अंतर्गत सर्जा-राजा गोशाळा व खिलार गोशाळा, काळोशी, ता. सातारा येथे दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याबाबत प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समीर बोरकर, प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, पुणे विभाग, तसेच डॉ. दिनकर बोर्डे , जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. नितीन मगर, डॉ. प्रवीण पवार, डॉ. विनोद पवार, तसेच सर्व तालुक्यांचे सहाय्यक आयुक्त, विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे, उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करणे, चारा साठवणूक व संवर्धन करणे आणि पशुधनासाठी संतुलित आहाराचे नियोजन करणे यांचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले.

दुष्काळाच्या काळात चारा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन, चाऱ्याची नासाडी टाळणे आणि सकस आहाराची उपलब्धता सुनिश्चित करणे हे पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता टिकविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याचे प्रात्यक्षिक.दुष्काळी परिस्थितीत चारा व्यवस्थापन व चारा संवर्धनाचे महत्त्व, पशुधनासाठी संतुलित आहाराचे नियोजन,चाऱ्याची नासाडी टाळून उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, पशुधनाचे आरोग्य व दूध उत्पादन टिकविण्यासाठी पशुपालकांना मार्गदर्शन इत्यादी उपक्रम यावेळी घेण्यात आले. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket