दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेचा नलगे कुटुंबाला लाभ- शाम झोरे शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम

सातारा-(प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेचा २४ वा वर्धापन दिन आज बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी ३८३ ब,३८ करंजे तर्फ, शाहूपुरी चौक येथील स्व:वास्तुत सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे. सदर मंगल प्रसंगी या शाखेने एक विशेष स्नेहसंमेलन आयोजित केले आहे .

तसेच सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या या शाखेने सुरसंगम सदाबहार नगमे हिंदी व मराठी गीतांचा सुरेल नजराणा गीत मैफिल रसिकांसाठी दीपलक्ष्मी संस्कृती हॉल शनिवार पेठ सातारा येथे सायंकाळी ५.३० वाचता आयोजित केली आहे. 

वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेल्या विशेष स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ.आ.ह. साळुंखे, संस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस, व्हॉ.चेअरमन आप्पासो शालगर, व्यवस्थापक विनायक भोसले, सह. व्यवस्थापक व शाखाधिकारी रवींद्र कळसकर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच सायंकाळी सातारकर रसिक श्रोत्यांसाठी आयोजित केलेल्या सुरसंगम गीत मैफिली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, श्रीराम नानल, मुकुंद फडके, विनायक भोसले, रवींद्र कळसकर उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना युनुस शेख व शाबुद्दीन शेख यांची असून निवेदन राजेश वंजारी करणार आहेत. तसेच या गीत मैफिल कार्यक्रमात युनूस शेख,शाहाबुद्दीन शेख, राजेश वंजारी, स्वाती शेडगे, रमीझा सय्यद, जास्मिन शेख, सुनील धनवडे, साधना धनवडे, मीना गोंदकर, तुषार पाटील, अमोल जाधव, मुन्नाभाई, नासिर पालकर, कपिल राऊत, गायक कलाकार भाग घेणार असून या कार्यक्रमाचे ऑडिओ- व्हिडिओ कलाकार स्टुडिओ सातारा, तसेच ध्वनी व्यवस्था युनूस शेख यांची आहे सदरचा सुरसंगम कार्यक्रमाचा हा ९६ वा भाग आहे.

 दीपलक्ष्मी पतसंस्था ही सहकार क्षेत्रात करत असलेल्या विश्वासु व पारदर्शक कारभारामुळे समाजामध्ये अल्पावधीतच नावलौकिक कमावला आहे तसेच सामाजिक बांधिलकीपोटी करत असलेले विविध उपक्रमाने संस्थेच्या कार्याचा आलेख दिवसें दिवस वृद्धिगंत होत आहे. अशा अल्पावधीत नावारूपास आलेल्या संस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या प्रगतीचा आढावा घेताना शिरीष चिटणीस म्हणाले संस्थेच्या या शाखेने ४ कोटी २५ लाख रुपयेच्या ठेवी समाजातून गोळा केले असून ३ कोटी रुपये समाजातील गरजू व्यक्तींना वाटप केले आहे. व तरल ते पोटी १ कोटी २५ लाख रुपयाची गुंतवणूक विविध बँकेमध्ये केली. या संस्थेने एकूण ४० कोटी रुपयाच्या ठेवीचा टप्पा जवळपास गाठला आहे.

तरी आपण ठेवीदार, सभासद, कर्जदार, हितचिंतकांनी शाहूपुरी शाखेच्या २४ वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेल्या विशेष स्नेहसंमेलन, सुरसंगम गीत मैफिल व श्री सत्यनारायण पूजेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.शाखेने यशस्वी २४ वर्षे पूर्ण केली असून २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात शाखा पदार्पण करत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम

दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या आज २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरसंगम गीत मैफिल कार्यक्रम सातारा-(प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेचा २४

Live Cricket