गौरीशंकर बी. फार्मसी विद्यार्थ्यांची गुणवत्तेत आकाशभरारी.
शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात उचित सत्कार.
लिंब-औषध निर्माण क्षेत्रातील दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाचे ज्ञान केंद्र म्हणून ओळख असणारे गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च, लिंब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. शैक्षणिक वर्ष सन 2025-2026 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणरे, जि. रायगड यांच्यामार्फत घेन्यात अलेलेल्या अंतिम वर्ष बी. फार्मसी परीक्षेत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च, लिंब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचा शैक्षणिक निकाल शंभर टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच महाविद्यालयामध्ये उचित सत्कार करण्यात आला यामध्ये गुणवत्तेत चमकदार कामगिरी करणारी विद्यार्थिनी श्वेता नागनाथ फरतडे, प्रणाली मोहन डोके, स्नेहा कृष्णा संकपाळ यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर, जनसंपर्क अधिकारी, श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते बुके, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ.माधुरी मोहिते, प्रा.नूतन कांबळे, प्रा.सायली ढवळे त्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर म्हणाले की शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देताना विद्यार्थ्यांच्या अंगीभुत कौशल्यालाही संधी महाविद्यालय स्तरावर दिली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला पूरक ठरत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलींद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले.
प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी केले.
औषध निर्माण क्षेत्रातील बदलते आव्हाने लक्षात घेता गौरीशंकर च्या विद्यार्थ्यांना आधुनिक व प्रगत शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडविले जात आहे. असंख्य विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील घेण्यात आलेल्या नव संशोधन स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चित अभिमानास्पद आहे.
मदनराव जगताप अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा.




