शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी जनहक्क क्रांती मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पाचगणी येतील शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल
Home » राज्य » पर्यटन » कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश

कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश

कास पठार हंगाम २०२६चा उत्साहात शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन; पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश

सातारा प्रतिनिधी : जागतिक वारसा लाभलेल्या कास पठाराच्या हंगाम २०२६चा शुभारंभ वन विभाग, सातारा वन परिक्षेत्र सातारा–मेढा आणि कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने उत्साहात करण्यात आला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

पावसाळ्यानंतर विविध रंगांच्या फुलांनी बहरून जाणारे कास पठार हे सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाची प्रमुख ओळख आहे. कासच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते.

यावेळी कास पठाराची जैवविविधता आणि नाजूक पर्यावरण जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन करण्यात आले. पर्यटकांनी वन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कासचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवावे, असेही सांगण्यात आले.

कास पठाराचा निसर्ग, जैवविविधता, स्थानिकांचा वारसा आणि पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचा समतोल साधत पर्यावरणपूरक व शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास अमोल सातपुते उपवनसंरक्षक  सातारा,भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर, स्थानिक नागरिक, पर्यटक तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा

शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा खंडाळा : ‘ही आवडते

Live Cricket