सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » Uncategorized » उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अजय देशपांडे सन्मानित ३१ वर्षे ६ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेसह तांत्रिक योगदानाची राज्य शासनाकडून दखल

उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अजय देशपांडे सन्मानित ३१ वर्षे ६ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेसह तांत्रिक योगदानाची राज्य शासनाकडून दखल

उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अजय देशपांडे सन्मानित ३१ वर्षे ६ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेसह तांत्रिक योगदानाची राज्य शासनाकडून दखल

महाबळेश्वर : सार्वजनिक बांधकाम विभाग, फलटण शाखेचे उपअभियंता अजय देशपांडे यांना राज्य शासनाच्या वतीने यंदाच्या ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात ३१ वर्षे ६ महिने प्रदीर्घ सेवा बजावली आहे. सेवाकाळात पश्चिम महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदारी सांभाळताना रस्ते, पूल तसेच शासकीय इमारतींच्या कामांमध्ये तांत्रिक गुणवत्ता, नियोजन आणि कार्यक्षमतेला त्यांनी प्राधान्य दिले.

महाबळेश्वर बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांच्या तांत्रिक कौशल्याची विशेष दखल घेण्यात आली. शिवसागर (कोयना) जलाशयावरील तापोळा येथील केबल स्टे ब्रीजच्या कामात त्यांनी महत्त्वपूर्ण तांत्रिक योगदान दिले. दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि विविध तांत्रिक आव्हानांवर मात करत हे काम पुढे नेण्यात त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली.

या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना देशपांडे यांनी, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आणि श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे विविध आव्हानांना सामोरे जात गुणवत्तापूर्ण काम करता आले, अशी भावना व्यक्त केली.

दीर्घ सेवाकाळातील तांत्रिक योगदानाची राज्य शासनाने दखल घेतल्याने अजय देशपांडे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket