अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक; १ नोव्हेंबरला मतदान

सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक; १ नोव्हेंबरला मतदान

सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक; १ नोव्हेंबरला मतदान

२५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात; २१ संचालकपदांसाठी निवडणूक प्रक्रिया

सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. बँकेच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक होणार असून, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे.

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची यादी १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणूक कार्यालयात करण्यात येणार आहे.

छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत

उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

२१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

——————————————-

१ नोव्हेंबरला मतदान

निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननी, माघार आणि अंतिम उमेदवार यादीपर्यंतच्या प्रक्रियेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

——————————————–

सातारा जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल : २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६

उमेदवारी अर्जांची यादी : १ ऑक्टोबर २०२६

अर्जांची छाननी : ५ ऑक्टोबर २०२६

वैध अर्जांची यादी : ६ ऑक्टोबर २०२६, सकाळी ११ वाजता

उमेदवारी अर्ज माघार : ६ ते २१ ऑक्टोबर २०२६

अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : २२ ऑक्टोबर २०२६

मतदान : १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ८ ते सायं. ५

मतमोजणी : ३ नोव्हेंबर २०२६

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये

Live Cricket