अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सातारा औद्योगिक क्षेत्रात कूपर उद्योगाचे विस्तारीकरण

सातारा औद्योगिक क्षेत्रात कूपर उद्योगाचे विस्तारीकरण

सातारा औद्योगिक क्षेत्रात कूपर उद्योगाचे विस्तारीकरण

सातारा प्रतिनिधी -सुमारे १०३ वर्षांची प्रदीर्घ आणि दैदिप्यमान ऐतिहासिक परंपरा असणा-या, तसेच साता-याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वपूर्ण योगदान देणा-या ‘कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. ने आपल्या नवीन विस्तार प्रकल्पाची (Expansion Project) घोषणा केली आहे. या भव्य प्रकल्पामुळे साता-यातील ३०० हून अधिक स्थानिक तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

साता-याच्या औद्योगिक प्रगतीचा कणा मानल्या जाणा-या कूपर कॉर्पोरेशनने हाती घेतलेल्या या नवीन प्रकल्पाचा मुख्य उद्देश इंजिनसाठी लागणा-या विविध सुट्या भागांची (Engine Components) निर्मिती क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवणे हा आहे.

तसेच कूपर कॉर्पोरेशनच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्क्यांहून अधिक भाग अमेरिका, युरोप आणि जगातील इतर प्रगत देशांमध्ये निर्यात केला जातो. कंपनीने गतवर्षी बाजारात दाखल केलेल्या ‘कूपर ट्रॅक्टर’ व्या चारही व्हेरिएंट्सना ग्राहकांचा आणि शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

साता-याच्या भूमीत १०३ वर्षापूर्वी रोवलेले हे औद्योगिक रोपटे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारले असून, नव्या विस्तार प्रकल्पामुळे साता-याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला आणखी मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

नवीन एम. आय. डी. सी. मधील कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. च्या इंजिन विभागातील युनिट एम-६०/१ या जागेवर विस्तारीकरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या प्लॉटच्या मध्यातून ३३ के. व्ही. (KV) आणि २२ के.व्ही. (KV) क्षमतेच्या हाय-टेन्शन वीजवाहिन्या गेल्या आहेत.

सुरक्षा नियमांनुसार या तारांखाली कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे बांधकामासाठी संपूर्ण जागा खुली व उपलब्ध व्हावी यासाठी या वीज वाहिन्या सदरील प्लॉटच्या सीमारेपेकडे (Borders) स्थलांतरित करणे अत्यावश्यक बनले आहे.

वीज वाहिन्या प्लॉटच्या सीमेकडे हलवण्यासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. ने ‘महावितरण’ (MSEDCL) आणि ‘महापारेपण’ (SETCL) कडे रीतसर प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, या प्रस्तावांवर वेळेत निर्णय न झाल्याने प्रत्यक्ष स्थलांतरास आणि पर्यायाने विस्तारीकरणाच्या कामास विलंब होत आहे. याशिवाय इतर संबंधित शासकीय परवानग्याही तातडीने मिळणे गरजेचे आहे.

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देणा-या या प्रकल्पासाठी वीज कंपन्यांनी तांत्रिक मंजुरी जलद गतीने देऊन वीज वाहिन्या प्लॉटच्या सीमारेषेवर स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा करावा, जेणेकरून पुढील कामास अधिक विलंब होणार नाही.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये

Live Cricket