थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रूपेरी पटावरील लोककलेची साधक तारका निमाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली

रूपेरी पटावरील लोककलेची साधक तारका निमाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली

रूपेरी पटावरील लोककलेची साधक तारका निमाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली

मुंबई- महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जतन करत रुपेरी पटावर अदाकारी आणि चतुरस्त्र अभिनयाने आपली ओळख निर्माण करणारी तारका निमाल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली आहे.

‘लोककला, रंगभूमी ते चित्रपट सृष्टी असा मधू कांबीकर यांचा कला प्रवास राहीला. लोककलेतील लावणीचा पारंपरिक बाज जपत त्यांनी कथ्थकच्या अभ्यासातून नृत्यांगना म्हणून लौकिक मिळविला. लावणीला आपल्या नृत्य शैलीने आणि नजाकतीने दिमाख मिळवून दिला. रुपेरी पडद्यावरही त्यांनी लावणीचे रूप आणखी खुलवून दाखविले. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत कसदार अभिनयाने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका समर्थपणे साकार केल्या. कांबीकर यांचा कला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आणि या क्षेत्रातील दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी असा राहीला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन कला क्षेत्राची मोठी हानी असून, मराठी लोक कलेची पताका रुपेरी पडद्यावर दिमाखाने फडकत ठेवणारी चतुरस्त्र तारका निमाली आहे. आम्ही कांबीकर कुटुंबीय आणि मधूताईंच्या चाहत्यांच्या दुःखात सहभागी असून या सर्वांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

माण खटाव बरोबर राज्यातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची

Live Cricket