हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी! सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे रूपाली राजपुरे व राजेंद्रशेठ राजपुरे यांचा सत्कार दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता-रोहयो मंत्री भरत गोगावले
Home » राज्य » शेत शिवार » रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सातारा दि. २८- सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थिती, कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि शेती उत्पादनावर होणारे संभाव्य प्रतिकूल परिणाम विचारात घेता, रब्बी हंगामात ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. रब्बी ज्वारी हे कमी पाण्यात येणारे महत्त्वाचे तृणधान्य व चारा पीक असल्याने, प्रतिकूल पर्जन्यमानाच्या परिस्थितीत अन्नधान्य व पशुचाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या पिकाच्या लागवडीला चालना देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन २०२६-२७ मध्ये रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे मिनीकीट स्वरूपात उपलब्ध करून देऊन रब्बी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे, तसेच अन्नधान्य व पशुचारा उपलब्धतेस हातभार लावणे हा प्रमुख उद्देश आहे.

सातारा जिल्ह्यासाठी प्रति लाभार्थी ४ किलो या प्रमाणे एकूण २५,८१० रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार एकूण १,०३२.४० क्विंटल बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. सदर मिनीकीट शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या घटकांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीटचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा. प्राप्त उद्दिष्टानुसार पात्र लाभार्थ्यांना बियाणे मिनीकीटचा लाभ देण्यासाठी कृषी विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. रब्बी हंगामातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांनी या विशेष योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य

Live Cricket