ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. तीव्र डिहायड्रेशन, व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांच्यावर डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आत्ताच डॉ. भन्साळी यांच्याकडे त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ते स्टेबल आहेत असे त्यांनी सांगितले.

अण्णा हजारे यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करत असून, या चाचण्यांच्या अहवालानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे. अनेक दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वास्थ होती. त्यांना प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असा त्रास होत होता. प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने आणि आजारपणामुळे ते अत्यंत अशक्त झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket