अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ

विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत लाभ

मुंबई, दि. २८: विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत’ भोजन, निवास आणि निर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे. शिक्षणाच्या ठिकाणानुसार विद्यार्थ्यांना ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. 6 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महागाई निर्देशांकानुसार योजनेतील भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण ८० हजार रुपये मिळतील. इतर महसूल विभागीय शहरांतील तसेच उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६८ हजार रुपये, अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरातील शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५७ हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये मिळतील. या रकमेत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी प्रतिवर्षी आठ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये ठोक स्वरूपात देण्यात येतील.

सातत्यपूर्ण स्थलांतर आणि उत्पन्नाच्या साधनांचा अभाव यामुळे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी निवास, भोजन आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च पेलताना अडचणी येतात. या विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात, यासाठी शासनाने सुधारित लाभ मंजूर केले आहेत. योजनेच्या इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असून, सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये

Live Cricket