अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जावळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; साधू चिकणे यांची मागणी

जावळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; साधू चिकणे यांची मागणी

जावळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; साधू चिकणे यांची मागणी

मेढा प्रतिनिधी : जावळी तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भातासह विविध पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागात पिकांची अवस्था चिंताजनक असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जावळी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी केली आहे.

जावळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भात हे तालुक्यातील प्रमुख पीक असून पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर इतर पिकांनाही पावसाच्या कमतरतेचा फटका बसत आहे.

या परिस्थितीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि शासनाच्या निकषांनुसार जावळी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी चिकणे यांनी केली.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पिकांचे नुकसान भरपाई, पाणी उपलब्धता तसेच इतर आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. शासनाने वेळ न दवडता सकारात्मक निर्णय घेऊन जावळीतील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही साधू चिकणे यांनी म्हटले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये

Live Cricket