उत्कर्ष पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर!
वार्षिक सभेत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; सभासदांच्या विश्वासाच्या बळावर उत्कर्ष पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल
वाई प्रतिनिधी -उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या सभेत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता सर्व सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच यावेळी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
उत्कर्ष पतसंस्थेने स्थापनेपासूनच सभासदांचे हित, विश्वासार्हता, पारदर्शक व्यवहार आणि तत्पर ग्राहकसेवा या मूल्यांना प्राधान्य दिले आहे. सभासदांचा संस्थेवरील दृढ विश्वास, ठेवीदारांचे सहकार्य आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची सातत्याने प्रगती होत आहे. याच विश्वासाच्या बळावर संस्थेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संस्थेचे संस्थापक कै. आनंद (अण्णा) कोल्हापुरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सन १९९९ मध्ये उत्कर्ष पतसंस्थेची स्थापना केली. त्यांनी घालून दिलेला सहकार, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा वारसा जपत संस्था आजही सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कर्ष पतसंस्था आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा, विविध ठेव योजना, सोनेतारण कर्ज, गृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसाय कर्ज, विमा सेवा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देत आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत सभासदांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि तत्पर सेवा देण्यावर संस्थेचा भर आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे समाजाच्या जडणघडणीतील मोलाचे योगदान, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांनी दिलेले संस्कार यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद व मार्गदर्शन ही संस्थेची अनमोल संपत्ती असून, त्यांच्या सन्मानासाठी आणि सेवेसाठी उत्कर्ष पतसंस्था सदैव कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे यांनी सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन करत संस्थेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक सभासदाचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. सभासदांचे आर्थिक हित जोपासणे, त्यांना आधुनिक आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीला चालना देणे हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत आगामी काळातही संस्था अधिकाधिक सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे, उपाध्यक्ष ॲड. श्री. रमेश रामचंद्र यादव तसेच संचालक श्री. अमर आनंद कोल्हापुरे, श्री. मदन कृष्णाजी साळवेकर, डॉ. श्रीमती मंगला प्रकाश अहिवळे, श्री. श्रीकांत सुनील शिंदे, श्री. शरद रामचंद्र चव्हाण, श्रीमती नीला मधुकर कुलकर्णी, श्री. सलीमभाई सोनुभाई बागवान, श्री. संजय लक्ष्मण वाईकर, श्री. सागर विलास मुळे, श्री. वैभव सुरेश फुले, श्री. भूषण सुधाकर तारु आणि श्रीमती अलका मदन घाडग यांची उपस्थिती होती.
तसेच सभेस श्री. रामचंद्र लोखंडे, श्री. बाळासाहेब वाघ, डॉ. शिंदे, कुलकर्णी काका, रसाळ सर, श्री. धर्मराज भोसले, श्री. शिवाजीराव निंबाळकर, श्री. रमेश गुरव, डॉ. मकरंद पोरे, श्री. अविनाश निंबाळकर, श्री. राजेंद्र चौधरी, धोमकर सर आणि श्री. प्रभाकर गाडे यांच्यासह अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते.
सभासदांच्या सक्रिय सहभागामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. उपस्थित सभासदांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या वाटचालीत सभासदांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या विश्वासाच्या बळावर भविष्यातही संस्थेची प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संस्थेच्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही सभासदांनी संस्थेवर असाच विश्वास ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सेवाभावाच्या बळावर उत्कर्ष पतसंस्थेची प्रगतीची वाटचाल यापुढेही सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




