अतिवृष्टीने जोर खोऱ्याचा वाई तालुक्याशी संपर्क तुटला
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील) अतिवृष्टीने जोर खोऱ्याचा वाई तालुक्याशी संपर्क तुटला; रस्ते, शेती गेली वाहून, जनजीवन व विस्कळीत मागील काही दिवसांत जोर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीने रस्ते, शेती वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाई तालुक्याचा जनसंपर्क तुटला आहे. जोर गोळेवाडी जाधव वस्ती व इतर पश्चिम भागांतील रस्त्यांची अवस्था फार भयावह झाली आहे.
आमदार मकरंद आबा पाटील यांनी सर्व यंत्रणांना परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाकडून भर पावसात युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीला सुरूवात झाली आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार अतिवृष्टीने जोर खोऱ्यातील रस्ते तुटुन गेले जनजीवन विस्कळीत झाले रस्तेखोऱ्यातील रस्ते वाहून गेले. जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते भात, नाचणीची शेतेही वाहून गेली. यामुळे या परिसराचा वाई तालुक्याशी जनसंपर्क तुटला. सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाकडून भर पावसात युद्धपातळीवर मोठ मोठ्या यंत्रसामुग्रीद्वारे रस्ते दुरुस्तीला सुरूवात करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जोर गोळेवाडी जाधव वस्ती व इतर पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था फार भयावह झाली आहे. काही घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागाचा वाई तालुक्यातील संपर्क तुटलेला आहे.आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजय परीट, आरोग्य अधिकारी संदीप यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश गोंजारी व जलसंपदा विभागाला ताबडतोबिने परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तात्काळ या गावांचा वाई तालुक्याशी संपर्क जोडून देण्याची सूचना केली आहे. आमदार मकरंद पाटील रविवारी या भागाचा दौरा करणार आहेत. जोर गोळेवाडी जाधव वस्ती व इतर संपर्क तुटलेल्या पश्चिम भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांची व मुंबई येथे या विभागाच्या सचिवांची रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी काम सुरू आहे.