युवा नेतृत्व दीपकदादा ननावरे यांच्या नेतृत्वात बावधन करांनी आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनास शिकविला धडा
सातारा -कधी कर्मचाऱ्यांच्या तर कधी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या कारणावरून आनेवाडी टोल नाका नेहमी चर्चेत राहत असतो. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री नऊ ते बाराच्या सुमारास टोल नाक्यावरील सर्व वाहने मोफत सोडण्यात आली.
बावधन गावचे युवा नेतृत्व दीपकदादा ननावरे आणि आणि तरुणांनी आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनास चांगलाच धडा शिकविल्या ची चर्चा सातारा जिल्ह्यात होत असून. स्थानिकांच्या वर अरेरावी नाक्यावरील कर्मचारी आणि व्यवस्थापन करत आहे. युवा नेतृत्व दीपक दादा ननावरे यांनी याबाबत वेळोवेळी आवाज उठविला आहे.नागरिकांकडून सतत येणाऱ्या तक्रारींमुळे आणेवाडी टोलनाक्याची चौकशी करणे गरजेचे आहे. आणेवाडी टोल नाका मॅनेजमेंटच्या गंभीर चुका समोर आल्या आहेत मनमानी शुल्क आकारणी, नियमांचे उल्लंघन आणि रहिवाशांना गैरसोयीची परिस्थिती निर्माण करत आहे.
आणेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनातील गंभीर चुका आणि मनमानी पद्धती उघडकीस आणणे गरजेचे आहे. नागरिकांकडून सतत तक्रारी येत असताना, टोलनाक्याचे मॅनेजमेंट नियमांचे पालन करण्यास मागे हटत होते. या कारवाईमुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. येणाऱ्या काळामध्ये टोल नाका व्यवस्थापनाने योग्य कारवाई न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला.
