तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले, ओळख पटवा व घेऊन जा. करंजे येथे उपस्थित रहा व पैसे परत मिळवा
देशातील बँका आणि नियामक संस्थाकडे तब्बल 1.84 लाख कोटी रुपयांची आर्थिक मालमत्ता बेवारस अवस्थेत पडून आहे. त्यासाठी सरकारने तुमचे पैसे-तुमचा हक्क या मोहिमेचा शुभारंभ सातारा येथे दिनांक 15/10/2025 रोजी महासैनिक भवन करंजे नाका येथे होत आहे.
रिझर्व्ह बँकेने उदगम नावाचे पोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टल वर आपण पैन, खाते नंबर किवा मोबाइल नंबर द्र्वारे आपल्या बेवारस रकमेची माहिती घेऊ शकतो. तसेच दावेदार किंवा वारसांनी कागदपत्रे सादर केलेनंतर त्यांना पैसे परत मिळणार आहेत.फक्त सातारा जिल्ह्यातील बँकामध्ये सुमारे 101 कोटी रुपये रक्कम बेवारस अवस्थेत पडून आहेत ती नेण्याकरीता त्यांचे मालक गेल्या 10 वर्षापासून बँकेकडे फिरकलेच नाहीत अशा खातेदारांची संख्या तब्बल 3 लाख 83 हजार 810 इतकी आहे. खातेदार पैसे नेण्यासाठी येत नसल्याने आणि या खात्यावर गेल्या 10 वर्षात एकही व्यवहार झालेला नसल्याने या बँकांनी हे पैसे रिझर्व्ह बँकेकडे जमा केले आहेत. आता रिझर्व्ह बँकेने या खातेदारांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे. नातेसंबंध सिद्ध करणारी कागदपत्रे घेऊन या आणि तुमचे पैसे घेऊन जा असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांनी केले.
