Post Views: 34
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदी युवा आणि संयमी किरणजी यादव यांची बहुमताने निवड
सातारा -प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नव्याने झालेल्या निवडीत अध्यक्षपदी किरण यादव यांची तर उपाध्यक्षपदी शहाजी खाडे यांची बहुमताने निवड झाली असून यावेळी सातारा जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदी युवा आणि संयमी व्यक्तिमत्व असलेले किरणजी यादव यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. किरणजी यादव यांच्या नेतृत्वात निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बँकेसाठी यशस्वी योगदान देणार असल्याचा गौरव उद्गार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
