Home » राज्य » यशराज घोरपडे यांची दिल्ली येथील संचालनासाठी निवड

यशराज घोरपडे यांची दिल्ली येथील संचालनासाठी निवड

यशराज घोरपडे यांची दिल्ली येथील संचालनासाठी निवड

सातारा-रायगाव येथील स्व. विजयसिंह मोहिते-काका यांचे नातु व सौ. भाग्यश्री सत्यजीत मोहिते घोरपडे यांचे चिरंजीव यशराज उर्फ करण सत्यजीत घोरपडे यांची नवी दिल्ली येथील २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या कर्तव्य पथावरील संचालनासाठी निवड झाली आहे.

यशराज यांचे शालेय शिक्षण पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये झाले असुन दहावीनंतर चे शिक्षण कोल्हापूर येथील आर्मड् फोर्सेस पि्रपरेटरी इन्स्टिट्यूट मधुन १२ पर्यंतचे शिक्षण झाले असुन सध्या ते भारतीय नौदलामध्ये नवल -ऐअरमन म्हणून अेव्हीएशन विभागात कार्यरत आहेत. 

एअरमन यशराज घोरपडे यांच्यामध्ये लहानपणापासून जिद्द ,चिकाटी, कणखर बाणा, नेतृत्व गुण ही कौशल्य होती. सैनिकी शाळेतील यशस्वी प्रशिक्षणानंतर नौदलामध्ये त्यांची निवड झाली आहे. त्यांचे शौर्य निष्ठा देशभक्ती आणि देशप्रेम याचा सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांचे पालक सत्यजित घोरपडे यांनी व्यक्त केली 

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंंचालनासाठी घोरपडे कुटुंबीय रायगाव येथील मोहिते परिवार तसेच ग्रामस्थांच्या वतीने यशराज यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket